सैफिनाची जोडी तब्बल 5 वर्षानी एकञ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

जवळजवळ पाच वर्षांनंतर सैफिना ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर ही जोडी ‘टशन’, ‘ओमकारा’, ‘एजंट विनोद’सारख्या चित्रपटात एकत्र दिसून आली.

२०१२ मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर दोघेही एकत्र पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहेत.

जवळजवळ पाच वर्षांनंतर सैफिना ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात सैफ मुख्य भूमिकेत आहे, तर करिना या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात करिना सैफच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याआधी करिनाने सैफच्या ‘हॅप्पी एडिंग’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरू आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News