सैफ अली खान आणि अमृता सिंगचा 'तो' किस्सा होतोयं व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 April 2020

सैफ नेहमीच आपल्या लव्ह लाइफबद्दल चर्चेत राहतो, मग ती त्याच्या पेक्षा १३ वर्षे मोठी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न आणि घटस्फोटाविषयी असो, किंवा करीना कपूर खानशी बॉन्डिंग, या सर्व गोष्टींमुळे तो सतत चर्चेत राहिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नेहमीच चित्रपटसृष्टीत मुलींचा आवडता राहिला आहे. आपल्या धडपडीत शैली आणि डॅशिंग अंदाजाने त्याने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. चित्रपटांव्यतिरिक्त तो वैयक्तिक आयुष्यातही प्रसिद्ध झाला आहे. सैफ नेहमीच आपल्या लव्ह लाइफबद्दल चर्चेत राहतो, मग ती त्याच्या पेक्षा १३ वर्षे मोठी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न आणि घटस्फोटाविषयी असो, किंवा करीना कपूर खानशी बॉन्डिंग, या सर्व गोष्टींमुळे तो सतत चर्चेत राहिला आहे. आता तो अमृता सिंगसोबत लांब जाऊन अनेक वर्षे झाली. करिनासोबत त्याचं मॅरीड लाईफ मजेत सुरु असल्याचं देखील दिसत आहे. मात्र तरीही सैफ आणि अमृताच्या पर्सनल लाईफचे अनेक किस्से समोर येत राहतात. असाच एक जुना किस्सा समोर आला आहे. त्यावेळी सैफ ने अमृताकडे आपल्या चुकीसाठी माफी मागितली होती. तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 
 
एकदा सैफ अली खान नाईट क्लबमध्ये होते. त्यावेळी त्यांची ओळख काही फॅन्स सोबत झाली. त्यावेळी सैफने आपल्या दोन महिला फॅन्ससोबत डान्स देखील केला. यावेळीच त्या दोन महिलांपैकी एकीच्या बॉयफ्रेंडसोबत सैफचे बाचाबाची झाली. एवढंच नाही तर, त्या मुलीच्या बॉयफ्रेंड सैफला धमकी दिली आणि एक मुक्का देखील दिला. मात्र सैफने ही गोष्ट वाढवून दिली नाही. त्यांनी पोलसांत तक्रार देखील केली नाही. ही गोष्ट मीडियापर्यंत पोहचू नये याची संपूर्ण काळजी त्याने घेतली होती. 

मात्र या गोष्टीमुळे सैफला वाईट वाटत  होते. आपल्या प्रामाणिकपणाचा दाखला देत त्याने अमृताची माफी मागण्याचा निणर्य घेतला. त्यावेळी त्याने कॅमेरासमोर जाऊन आपल्या या गोष्टीसाठी माफी मागितली, आणि पुढे या गोष्टी आपल्याकडून होणार नाही, असं प्रयत्न करू, असं देखील म्हणाला. काही वर्षांनी अमृताशी वेगळं झाल्यानंतर सैफ अली खानने बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करीन कपूरची लग्न केले. या लग्नानंतर तैमूर अली खान याचा जन्म झाला. जो एवढ्या लहान वयात स्टार होणारा पहिलाच मुलगा आहे. अमृताकडून सैफचे दोन मुलं आहेत. इब्राहिम अली खान आणि सारा अली खान. साराने बॉलिवूडमध्ये इंट्री केली असून आता ती वेगवेगळे चित्रपट करत आहे. 

सध्या सैफ अली खानकडे अनेक चित्रपट आहेत. यामध्ये गो गोवा गॉनच्या सिक्वेलसह बंटी और बबली २, भूत-पोलीस या काही चित्रपटांचा समावेश आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News