'या' चित्रपटात सई दिसणार नव्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 September 2019

सईचा नवा प्रयत्न, आयुष्याच्या वळणावर येणाऱया वेगळय़ा नात्यांचा प्रवास उलगडवणारा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरचा रोमॅण्टिक अंदाज, बोल्ड लूक आजवर साऱ्यांनीच पाहिला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातही सई भलतीच भाव खाऊन गेली. आता ती एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहे. एका मध्यमवर्गीय बंडखोर बाईची ही कथा आहे.

मुलगी, पत्नी, आई आणि प्रेयसी या नात्यांमध्ये गुरफटलेली सई तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि त्यानंतर काय घडतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

स्मिता फिल्म प्रॉडक्‍शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे. आजच्या काळातील प्रश्‍न प्रेक्षकांसमोर मांडण्याचा नवा प्रयत्न सई या चित्रपटाच्यानिमित्ताने करणार आहे. हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.
  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News