सई गेली वरुन धवलच्या जीममध्ये; कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई. अभिनेता धवल यांच्या जुहू येथील जीममध्ये गेली होती. त्यावेळी फोटोग्राफरने त्यांना गाठले, विविध पोजमध्ये फोटो काढले आणि प्रश्न विचारले. सईने त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई मांजरेकर ही अभिनेता वरुन धवल यांच्या जिममध्ये दिसली, त्यामुळे आगामी काळात ही नवीन जोडी चित्रपटात दिसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई अभिनेता धवल यांच्या जुहू येथील जीममध्ये गेली होती. त्यावेळी फोटोग्राफरने त्यांना गाठले, विविध पोजमध्ये फोटो काढले आणि प्रश्न विचारले. सईने त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. गुजराती भाषेत संवादही साधला. वरुन धवलच्या जीनमध्ये सई वर्कआवूट करण्यासाठी गेली होती की, भविष्यातील चित्रपटाची चर्चा करण्यासाठी हे मात्र सध्यातरी कळू शकले नाही, मात्र भविष्यात ही जोडी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की आहे.  

कोण आहे सई  मांजरेकर?

प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे लाडकी मुलगी सई मांजरेकर. सलमान खानचा सुपर हीट चित्रपट दबंग 3 द्वारे बॉलीवूडमध्ये सईने इंट्री केली. दबंग3 मध्ये सईने दिलेला हटके लूक प्रेक्षकांना आवडला, अनेकांनी या लुकचे फोटो शेअर केले, त्यामुळे सई चर्चेत आली होती. आता वरुन धवन यांच्यासोबत चित्रपट करणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी सईने मांजा नावाचा एक अल्बम रिलीज केला होता. अभिनेता आयुष शर्मा सोबत सईने आपला फोटो शेअर केली, यावर चहात्यांनी त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News