सतत मदतीसाठी तत्पर 'सह्याद्री सर्च अँड रेस्क्‍यू फोर्स'

गजेंद्र बडे
Saturday, 26 January 2019

राज्यात होणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीसाठी धावून येणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्याचसोबत अनेक ग्रुप देखील आहेत जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीला धावून जातात. त्यातीलच सह्याद्री अँड रेस्क्यू फोर्स ग्रुप आहे. पुणे जिल्ह्यातील भोर येथील हा सह्याद्री सर्च अँड रेस्क्‍यू फोर्सच्या जवानांचा ग्रुप आहे. अपत्कालीन स्थितीत आणि अपघातप्रसंगी सरकारी यंत्रणांच्या बरोबरीने आपद्‌ग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा हा युवकांचा गट आहे.

राज्यात होणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीसाठी धावून येणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्याचसोबत अनेक ग्रुप देखील आहेत जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीला धावून जातात. त्यातीलच सह्याद्री अँड रेस्क्यू फोर्स ग्रुप आहे. पुणे जिल्ह्यातील भोर येथील हा सह्याद्री सर्च अँड रेस्क्‍यू फोर्सच्या जवानांचा ग्रुप आहे. अपत्कालीन स्थितीत आणि अपघातप्रसंगी सरकारी यंत्रणांच्या बरोबरीने आपद्‌ग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा हा युवकांचा गट आहे.

घाटातील रस्त्यांवर अपघात झाल्यास, आग लागल्यानंतर, डोंगरांना मोठे वणवे लागल्यावर, ओढ्या-नाल्यांना पूर आल्यावर, ट्रेकिंग करताना आणि किल्ल्यावरून दरीत पडलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी या तरुणांचे नेहमी सहकार्य लाभत असते. यामुळे सरकारच्या महसूल, वन, कृषी विभागांबरोबरच पोलिसांनाही यांची जास्त मदत होते.गेल्या पाच वर्षांपासून सचिन देशमुख व अमित कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप काम करत आहे. यामध्ये २३ युवक कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत केवळ पुणे जिल्हाच नव्हे तर, अन्य जिल्ह्यांमध्येही तातडीने घटनास्थळी जाऊन प्रशासनाला सहकार्य केलेले आहे.

भोर-सातारा जिल्ह्यातील मांढर (ता.वाई) येथील मांढरदेवी (काळूबाई) देवीच्या यात्रेच्या काळात अंबाडखींड घाटात वाहनचालकांना मदत करणे, प्रवाशांसाठी पाण्याची सोय करणे यासारखी कामे ते नियमितपणे करतात. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट, कोकणातील पोलादपूर घाट, अंबेनळी घाट, अंबोली आणि ताम्हिणी या घाटामध्ये अपघाताने हजारो फूट दरीत पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. रायरेश्वर (ता.भोर) आणि मढेघाट (ता.वेल्हे) येथे पर्यटनासाठी आलेले पर्यटक दरीत पडले. त्यांना दरीतून बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम सह्याद्री सर्च अँड रेस्क्‍यू फोर्स चे जवान पोचले होते.

पावसाळ्यात दुर्गम भागातील गावांमधून पडलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणांचे मृतदेह शोधणे, जंगलातील वणवे विझविणे आदी कामे हे तरुण करत असतात. यामध्ये सुनील सावंत, विनायक दुधाणे, प्रशांत कुंभार, शुभम पवार, इंद्रजित चुनाडी, आकाश ओतारी, सचिन सावंत, विजय सुरगुडे, सोहम पवार, अतुल वालगुडे, किरण पवार, सुशांत पवार, शंकर तांबे, अक्षय बदक, ओंकार बहिरट, मीनानाथ देशमुख, विजय वालगुडे, तबरेज खान, अमित शेवते, अक्षय वीर, गौरव कुंभार व अजय वालगुडे आदींचा समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News