सह्याद्री" किंवा " पश्चिम घाट " हिच खरी महाराष्ट्राची ओळख

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

महाराष्ट्राचा गौरव म्हणजे सह्याद्री. ज्याला बघून महाराष्ट्रीयन माणसाचा उर अभिमानाने भरून येतो तो म्हणजे " सह्याद्री " सह्याद्रीच सौदर्य म्हणजे तिथले गड आणि किल्ले. 

महाराष्ट्राचा गौरव म्हणजे सह्याद्री. ज्याला बघून महाराष्ट्रीयन माणसाचा उर अभिमानाने भरून येतो तो म्हणजे " सह्याद्री " सह्याद्रीच सौदर्य म्हणजे तिथले गड आणि किल्ले. अशाच काही दुर्गम काही परीचीत काही अपरिचित गड किल्ल्यांची माहिती तसेच समुद्रात बांधलेल्या मराठी आरमाराची शान असणाऱ्या मानव निर्मित समुद्री दुर्ग ह्यांची माहिती ह्या सदरात देत आहोत.

महाराष्ट्राचे इतके सुंदर वर्णन अजून काही असूच शकत नाही. आपल्या अमर्याद शब्द सामर्थ्याच्या जोरावर कवी गोविंदाग्रज ( राम गणेश गडकरी ) ह्यांनी समग्र महाराष्ट्राचे त्यातील विविध रंगांचे, प्रतिभेचे , कलागुणांचे केलेले वर्णन केवळ विलोभनीय.

महाराष्ट्र खऱ्याखुऱ्या अर्थाने विविध रंगांनी नटलेले राज्य. कुठे निसर्गाची मुक्त उधळण, कुठे कलेची पखरण तर कुठे शिक्षणाचे कोंदण !अठरापगड जाती जमातींच्या वास्तव्याने बहरलेल्या ह्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताची स्वत:ची अशी खास ओळख. त्यात भाषेची खुमारी असो , वेशभूषेतील विविधता असो किंवा खाद्यपदार्थांची खासियत असो.

नगरधन किल्ला -

नागपूर पासून ५० किमी अंतरावर रामटेक किल्ला आणि तिर्थक्षेत्र आहे. या रामटेकपासून ७ किमी अंतरावर "नगरधन" नावाचा सुंदर भुईकोट किल्ला आहे. नागपूर जवळील रामटेक पहायला येणारे पर्यटक मात्र या किल्ल्याकडे फिरकत नाहीत. इ.स. २०१२ मध्ये पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडूजी केलेली आहे. त्यामुळे हा किल्ला आता पुन्हा आपले पूर्वीचे वैभव दाखवत दिमाखात उभा आहे. किल्ल्यातील भूयारी मंदिर हे अजून एक आकर्षण आहे.वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज. या तटबंदीत चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीची उंची ६ ते ८ मीटर असून त्यावर चर्या आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. फांजी ३ ते ४ फूट रुंद असून त्यावरून किल्ल्याला आतून प्रदक्षिणा घालता येते.

कोर्लईचा किल्ला -

यगड जिल्ह्यातील अलिबाग, रेवदंडा, मुरुड - जंजिरा ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. अलिबागहून मुरूड-जंजिर्यातच्या दिशेने जातांना कुंडलिका खाडी जिथे समुद्राला मिळते. त्या ठिकाणी समुद्र व खाडीच्या संगमावरील टेकडीवर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे.किल्ल्याच्या खाली लाईट हाऊस आहे. सरकारी शुल्क भरून ते आतून पाहाता येते. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्यार चढून आपण १० मिनिटात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. इथून आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला दिसतो. चिंचोळ्या डोंगरमाथ्यामुळे किल्ल्याची रूंदी कमी आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे व डावीकडे प्रवेशव्दारे दिसतात. ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर २ तोफा दिसतात. पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते, याच्या माथ्यावर ४ तोफा पाहायला मिळतात. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला पांढर्याय देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. 

गोवळकोटचा किल्ला -

त्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर कोकण रेल्वेने आणि मुंबई - गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. चिपळूण शहरातून वाशिष्टी नदी वाहाते. प्राचिन काळी या नदीतून परदेशी व्यापारी मालाची वाहतुक होत असे. त्यामुळे कोकण व घाटमाथा यांच्या मध्ये असलेले चिपळूण हे गाव प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोट किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती.
आजही चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर "गोवळकोट उर्फ गोविंदगड" हा किल्ला उभा आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदी वाहाते तिचे नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला मिळाले आहे., तर उरलेल्या चौथ्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला आहे. चिपळूण शहरातून २ तासात किल्ला पाहून होतो.गडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज अजूनही शाबूत आहेत. यातील उजव्या बुरुजावर चढून गेल्यावर दोन तोफा दिसतात. किल्ल्याच्या तटाची रुंदी साधारणपणे ८ फूट आहे.

अकलूजचा किल्ला -

अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. इसवी सनाच्या १३ व्या शतकात यादव वंशीय राजा सिंघनने अकलूज शहर वसवल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळापासून आजपर्यंत एक मह्त्वाची बाजारपेठ म्हणून हे शहर प्रसिध्द आहे. अकलूज शहरातून नीरा नदी वहाते या नीरेच्या काठावर अकलूजचा भूईकोट किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी म्युरल्स्‌ , पुतळे यांच्या सहाय्याने किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी व कारंजी, हिरवळीचे पट्टे., फुलझाडे लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे अकलूज किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो.किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इत्यादींचा समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत.

सिंधुदुर्ग -

मालवणच्या समुद्रात असलेल्या ''कुरटे'' बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना आज्ञा केली; " या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्यांंशी बंदरी ऐशी जागा नाही"! दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्या वरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला

प्रतापगड -

पौराणिक व एतिहासिक संदर्भ लाभलेल महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. ''महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. प्रतापगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जाणारा गाडीमार्ग, किल्ल्यावर फिरण्यासाठी बनवलेल्या सिमेंट रूंद पायर्याड, रस्ते व किल्ल्यावर उपलब्ध असलेली खान पान सेवा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.प्रतापगडाच्या दक्षिणेस असलेल्या टेहाळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे. येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे.

हरिश्चंद्र - 

मुंबई , कल्याण मार्गे नगरला जातांना माळशेज घाट लागतो. माळशेज घाटाच्या डावीकडे हरिश्चंद्रगडाचा अजस्त्र पर्वत दिसतो. चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या हरिश्चंद्रगडाला आजही हजारो ट्रेकर्स, पर्यटक भेट देत असतात. गडावर जाणार्यान दुर्गम वाटा, गुहेतील वास्तव्य, गडावर होणारी चहापाण्याची व जेवणाची सोय ,कोकणकड्यावरून दिसणार विहंगम दृश्य, इथला इतिहास, निसर्ग अशी अनेक कारण ट्रेकर्सना परत परत या किल्ल्यावर खेचुन आणतात. पावसाळ्यात फुलणार्या विविध रानफुलांमुळे हरिश्चंद्रगडाचे सौदर्य काही औरच दिसते.

हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. त्यापैकी सर्वात जास्त वापरल्या जाणर्याा टोलारखिंडीच्या वाटेने आपण ३ तासात आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन मंदिर व गुहा आहेत.

राजगड किल्ला -

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक किल्यांपैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला गडांचा राजा राजगड. आज एवढ्या वर्षानी फार कमी देखरेखीत असला तरीही भक्कम उभा आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी भेट द्यावा आणि ती दिल्यावर पुन्हा पुन्हा भेट द्यायला लावेल असा हा राजगड.
आजही गडावर १५० ते २०० माणसांना राहण्याची, जेवणाची सोय गावकरी बारा महिने करतात (हॉटेल नाहीत). राहण्यासाठी पद्मावती देवीचे देऊळ, भक्त निवास आणि शासकीय विश्रामगृह आहेत तसेच पिण्याच्या पाण्याच्या २ विहिरी असून त्यांना १२ महिने पाणी असते.गडाकडे येण्याचे मुख्य रस्ते म्हणजे पाली गावातून येणारा पाली दरवाजा (हे पाली अष्टविनायकातील नव्हे) आणि गुंजवणे गावातून येणारा गुंजवणे दरवाजा. गुंजवणे दरवाजा आता वापरात नाही पण गुंजवणे गावातून एक रस्ता चोर दरवाज्याने येतो तोच प्रामुख्याने वापरला जातो त्याने पद्मावती माचीवर २ तासात पोहोचता येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News