सरावापेक्षा खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 June 2020
  • बीसीबीचे मुख्य कार्यकारी निजामुद्दीन चौधरी यांचे मत 

ढाका : मीरपूर स्थित असलेल्या शेर-ए-बांगला मैदानाचे निर्जंतुकीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. साथीच्या आजारांदरम्यान आरोग्य सुरक्षेच्या चिंतेचा मुद्दा सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मैदानावरील प्रशिक्षणास परवानगी फेटाळली आहे. माजी कर्णधार मुशफिकुर रहीम आणि अन्य वरिष्ठ खेळाडूंनी मैदानावर सराव करण्यास बोर्डाकडे परवानगी मागितली होती. कोविड -19 या साथीच्या रोगामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आल्या आहेत.

"मुशफिकुरने आमच्याशी संवाद साधला, त्याला वैयक्तिक प्रशिक्षण सुरू करायचे होते. त्याने घरी प्रशिक्षण घ्यावे, प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, परंतु सद्यपरिस्थितीत सरावापेक्षा खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे," असे बीसीबीचे मुख्य कार्यकारी निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले. 

मैदानाचे निर्जंतुकीकरणाचे काम पूर्ण झाल्यास पुढील निर्णय घेऊ, तोपर्यंत कोणालाही मैदानावर सराव करता येणार नाही, असे ते म्हणाले. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका येथील क्रिकेटपटूंचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. याव्यतिरिक्त बांगलादेशात कोविड -19 या साथीच्या रोगाची लागण 50 हजार लोकांना झाली असून त्यातील जवळपास 800 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News