Sacred Games आणि 'गणेश गायतोंडे'चं नेमकं लफडं काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 18 August 2019

आपल्या अभिनयाने थाेड्याच दिवसात बाॅलिवूडला भूरळ घालणारा अभिनेता म्हणजे नवाजुुद्दीन सिद्दिकी हाेय. सध्या व्यस्त अभिनेत्यांपैकी ताे एक आहे. नवाज एकाचवेळी तीन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. यानुसार, तीन महिने सलग व्यस्त राहणार आहे. तो सध्या भाऊ शमास सिद्दिकीच्या 'बोले चूड़ियां'साठी राजस्थानमध्ये शूटिंग करत आहे. याच महिन्यात तो आपल्या 'डस्टी टू मीट रस्टी'चे शूटिंगदेखील सुरू करणार आहे.

मुंबई : आपल्या अभिनयाने थाेड्याच दिवसात बाॅलिवूडला भूरळ घालणारा अभिनेता म्हणजे नवाजुुद्दीन सिद्दिकी हाेय. सध्या व्यस्त अभिनेत्यांपैकी ताे एक आहे. नवाज एकाचवेळी तीन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. यानुसार, तीन महिने सलग व्यस्त राहणार आहे. तो सध्या भाऊ शमास सिद्दिकीच्या 'बोले चूड़ियां'साठी राजस्थानमध्ये शूटिंग करत आहे. याच महिन्यात तो आपल्या 'डस्टी टू मीट रस्टी'चे शूटिंगदेखील सुरू करणार आहे.

'सॅक्रेड गेम्स 2' चे प्रमोशनही नाही करू शकला - 
आपल्या व्यस्त शेड्यूलबद्दल नवाज म्हणते, 'हो, माझ्याकडे खूप प्रोजेक्ट्स आहेत आणि मला खूप काम करायचेही आहे.' व्यस्ततेमुळे तो आपली वेब सिरीज 'सॅक्रेड गेम्स' च्या दुसऱ्या सीजनचे प्रमोशन करू शकत नाहीये. त्याचा चित्रपट 'डस्टी टू मीट रस्टी' चे दिग्दर्शन ग्लेन बर्रेटोस करत आहे. तर 'नो मेन लँड' या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन बांग्लादेश दिग्दर्शक मुस्तफा सर्वर फारुकी करत आहे. चर्चा आहे की, 'ठाकरे' चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टवरही तो काम करणार आहे आणि हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे.

नवाजकडे प्रोजेक्टची लाइन  - 
नवाज पुढचे २ ते ३ महिने खूपच व्यग्र राहणार आहे. 'बोले चूडियां'च्या शूटिंगनंतर नवाज 'डस्टी टू मीट रस्टी'चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग एक महिना चालणार आहे. याची कथा मुंबईहून धर्मशालाला जाणाऱ्या एका मुलीवर आधारित आहे. चित्रपटाची कास्ट आणि क्रू याचे शूटिंग मूळ लोकेशन्सवर करणार आहे. याचे शूट एकाच भागात पूर्ण केले जाईल. यानंतर नवाज अमेरिकेत जवळजवळ एक महिना 'नो मेन लँड'चे शूटिंग करणार आहे. याचे जास्तीत जास्त शूटिंग अमेरिकेत होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News