यूफोरिया 2019 च्या महोत्सवात सचिन पिळगावकरचा धम्माल डान्स

सुरज पाटील
Wednesday, 30 January 2019

पिल्लई एचओसी एज्यूकेशनल कॅम्पसच्या यूफोरिया 2019 च्या धम्माल यूथ फेस्टिवलला मराठी अभिनेत्यांनी हजेरी लावली. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये धम्माल गाजवणाऱ्या अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकरनेही या कार्यक्रमाला  भेट दिली. ढोलताशांच्या गजरात सचिन आणि त्याच्या टीमचे स्वागत करण्यात आले. सचिनने दिग्दर्षित केलेला आगामी चित्रपट "अशी ही आशिकी" या चित्रपटाचे प्रमोशनही यावेळी करण्यात आले.

सचिन पिळगावकर आणि त्याच्या टीमने यूफोरिया 2019 या फेस्टिवलच्या टी-शर्टचे अणावरण देखील केले. यावेळी सचिनने काम केलेल्या विविध चित्रपटातील गाण्यांच्या मैफिलीवर अवघ्या तरुणाईने ठेका धरला. तर सचिननेही तरूणाईला साथ देत त्याच्या आगामी चित्रपटातील गाण्यावर ताल धरला. पिल्लई एचओसी एज्यूकेशनल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी सचिनला त्याचीच फ्रेम भेट देऊन सन्मानित केले. एकदम धम्माल गाजवणाऱ्या अभिनेत्याला ज्यावेळी सुपरस्टार म्हणून बोलवण्यात आले, त्यावेळी मी सुपरस्टार नसून मी एक हिरो आहे, या सचिनच्या विधानावर अख्ख्या तरणाईने जल्लोष केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News