सचिनकडून पाच हजार लोकांना महिनाभर रेशनची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 April 2020
  • शिवाजी नगर, गोवंडीतील रहिवशांना मदत

मुंबई: कोरोनाच्या लढ्यासाठी पंतप्रधान आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्य निधीला अगोदरच प्रत्येकी 25 लाख रुपये सहाय्य देणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता अपनालया एनजीओ मार्फक आणखी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवाजी नगर आणि गोवंडी येथील पाच हजार लोकांची एका महिन्यासाठी तो रेशनची व्यवस्था करणार आहे.

अपनालया या एनजीएओने ट्‌विटकरून सचिनचे आभार मानले आणि त्याच्या सहकार्याची ही माहिती उघड केली. अजूनही अनेकांना मदतीची गरज आहे त्यामुळे इतरांनीही सहकार्य करावे असे अपनालयाने म्हटले आहे. तुमचे कार्य सुरु ठेवा, असा उल्लेख सचिनने आपल्या ट्‌विटमध्ये केला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News