या देशात साबुदाणा खिचडीची क्रेझ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 August 2020

या देशात साबुदाणा खिचडीची क्रेझ

या देशात साबुदाणा खिचडीची क्रेझ

साबुदाणा खिचडी हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे, भारतात प्रामुख्याने उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाल्ली जाते. त्याचपध्दतीने साबुदाणा खिचडी ही आपल्या आरोग्यासाठी सुध्दा चांगली आहे. तिचे शरीरासाठी होणारे फायदे सुध्दा आपल्याला माहित आहेत. पण आता आपल्या आवडत्या खिचडीची क्रेझ आता परदेशातही पाहावयास मिळतं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रसिध्द झालेल्या लेखात समिन नोसरत यांनी खिचडीबाबतचा अनुभव कथन केला आहे.

नोसरत यांनी आपले मित्र हृषिकेश हिरवे यांच्यासह ‘होम कुकींग’ या पॉडकास्टची सुरूवात केली. हिरवे यांना पॉडकास्टचीही विशेष आवड आहे. संगीतकार हिरवे हे अनेकदा श्रोत्यांचे समस्या नोसरत यांच्यापर्यंत पाठवतात. एका महिलेने चक्क एका हाताला दुखापत झाल्याने एका हाताने कोणता पदार्थ बनवता येईल असा प्रश्न विचारला होता. त्यावर भाताच्या खिचडीचा पर्याय सुचवला होता असं नोसरत यांनी लेखात उल्लेख केला आहे.

साबुदाणे, शेंगदाणे, उकडलेले बटाटे आणि तिखटासह थोडी कोथिंबिर अशा पदार्थांच्या साहाय्यानं साबुदाणा खिचडी बनवली जात असल्याचं हिरवेंनी सांगितलं. मी लहान असल्यापासून आई शेंगदाण्याशिवाय मला खिचडी बनवून देत होती. कारण मला शेंगदाण्याची आवड होती, असंही हिरवेंनी नोसरत यांना सांगितलं.

साबुदाणा खिचडी कशी बनवतात हे सांगितल्यानंतर नोसरत यांनी अमेरिकेतील भारतीय दुकानात गेले आणि साबुदाणा आणला. त्याचबरोबर तो भिजत सुध्दा घातला. परंतु पदार्थ तयार करण्यात अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी इंटरनेटचा आधार घेतला. पण खिचडी तयार करण शक्य नसल्याचं नोसरत यांनी सांगितल. भारतात आल्यानंतर नोसरत यांच्या आईवडिल कशी खिचडी बनवतात हे नक्की पाहीन, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अन्य पदार्थांचाही आस्वाद घेईन असं लेखात म्हटलं आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News