येवलाच्या एस. एन. डी. महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

सागर वाघ, येवला
Thursday, 27 February 2020

येवला - गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला येथे विद्यार्थी विकास मंडळ आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे अध्यक्ष स्थानी होते. तसेच महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. सुनिल खैरनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

येवला - गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला येथे विद्यार्थी विकास मंडळ आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे अध्यक्ष स्थानी होते. तसेच महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. सुनिल खैरनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.  एस. बी. ठाकरे यांनी केले. कवी कुसुमाग्रज जन्मदिन, मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून महाविद्यालयात साजरा करण्यात आला.  

मराठी भाषा गौरव दिनानिमत्त विद्यार्थी विकास मंडळातर्फे काव्य वाचन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेय या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पाहायला मिळते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनिल खैरनार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या महाराष्ट्राला संताची परंपरा लाभली आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातुन मराठी भाषेतील साहित्य आपल्या जीवनात कसे महत्वाचे आहे, याचे महत्व यावेळी प्रा. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांनी मातृभाषा ही जीवनाची शिदोरी असून तिची साथ माणसाला आयुष्यभर पुरते. मराठी राजभाषामुळे लेखन, वाचन, श्रवण, संभाषण या द्वारे व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या पातळीत वाढ करू शकतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात मराठी मातृभाषा एक अमृतच आहे. असे मौलिक मार्गदर्शन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांनी केले. 

या कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रा. दिपक मढवई, यांनी केले. आभार प्रा. संतोष आहेर यांनी मानले. या प्रसंगी प्रा. धनगे जी. बी, प्रा. काथेपुरे जी. पी, प्रा. करंजकर एस. एम, प्रा. माधव बनकर, प्रा. ललित घाडगे, प्रा. नितीन साळवे, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. मोहित गवारे, प्रा. अजय आदमाने, प्रा. बाबसाहेब गाडेकर, प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. आण्णा व्हडगळ, प्रा. महेंद्र म्हसे, प्रा. लक्ष्मण देवढे, प्रा. तृप्ती काळंगे, प्रा. साळवे, प्रा. देवकर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. निता मोरे, प्रा. जयश्री आहेर, प्रा. रचना भागवत, प्रा. सोमनाथ डूबे, प्रा. चव्हाणके, श्री. दीपक जाधव, प्रा. कुणाल भावसार, सौ. सुखदा देवगावकर, प्रा. अफसाना कादरी, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, श्री. नवनाथ सुराळकर, श्री. श्रावण गायकवाड, श्री. किरण मुंढे व श्री. प्रवीण मोरे सौ. मेनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News