एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आनंद मेळावा संपन्न

सागर वाघ, येवला
Friday, 10 January 2020

एस. एन. डी.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पाचव्या दिवशी संगीत खुर्ची व आनंद मेळावा उत्साहात साजरा

दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला येथे निनाद युवा महोत्सवाचा पाचवा दिवस होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे, उपप्राचार्य सुनिल खैरनार व ज्युनिअर विभागाचे प्राचार्य शिवाजीराव बेंद्रे यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.

मुलांनी आनंद मेळावा आणि संगीत खुर्चीमध्ये उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. यावेळी मुलांनी विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. यात पाव भाजी, पाणी पुरी, ढोकळा, कचोरी, वडा पाव सॅन्डविच, क्रिमरोल, अॅपल बोरे इ. पदार्थ होते. मोहन आहेर, विकास गुठले, काळे वैष्णवी, अनुप्रिता खैरनार, ॠषिकेश निकम, विनोद गुडघे, राहुल सरोदे, वैभवी काळे, कावेरी खरे, अश्विनी कामडे, मनिषा टुपके, मयुर मोरे, वैभव भड, कावेरी शेळके, प्रतीक गायकवाड, पल्लवी जगताप, स्वामीनी जगताप, सदाशिव जाधव, प्रशांत मोरे, विशाल दुसाने, धनश्री गायकवाड, विद्या शेळके, दिपाली मोरे, प्राची तुपे, गायत्री खोडके या मुलांनी आनंद मेळाव्यात सहभाग नोंदवून आपल्या पाक कलेचे प्रदर्शन केले.

त्यानंतर संगीत खुर्ची झाली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मनमुरादपणे आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतला. यासाठी प्रा. गणपत धनगे, प्रा. गोरखनाथ काथेपुरे, प्रा. माधवराव बनकर, प्रा. नितीन साळवे, प्रा. सुनिल पवार, प्रा. अमोल पवार, प्रा. गवारे, प्रा. बाबासाहेब गाडेकर, प्रा. जितेंद्र थोरात, प्रा. संदिप ठाकरे,  प्रा. दिपक मढवई प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. ललित घाडगे, प्रा. संतोष आहेर, प्रा. संजय करंजकर, प्रा. शुभम देवकर, प्रा. अजय अदमाने, क्रिडा शिक्षक कुणाल भावसार, दिपक जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर सुराळकर, श्रावण गायकवाड, पवार, प्रा. सुवर्णा खापटे, प्रा. रचना भागवत, प्रा. अफसाना कादरी, प्रा. जयश्री आहेर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. प्रियंका चव्हाण तसेच ज्युनिअरचे प्रा. व्हडगळ, प्रा. देवडे, प्रा. काळुंगे, प्रा.  साळवे इत्यादींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News