हेरीटेज वॉक मधुन किल्ला पर्यटनास चालना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019
  • इको-प्रो चे हेरीटेज वॉक - किल्ला पर्यटनातुन गोंडकालीन इतिहासास उजाळा
  • माहेश्वरी समाज महीला मंडळ व जिल्हा युवा प्रशिक्षण शिबीरार्थीचा सहभाग 
     

चंद्रपूर: किल्ला स्वच्छतेसोबत आता हेरीटेज वॉकला सुध्दा नागरीकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज राबविण्यात आलेल्या इको-प्रो च्या हेरीटेज वॉक या किल्ला पर्यटनाच्या उपक्रमात आज शहरात माहेश्वरी समाज महीला मंडळ व जिल्हा युवा शिबीरातील प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता.

चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला-परकोटाची स्वच्छता अभियानास ७५० दिवस पुर्ण होत असुन या नागरीकांमध्ये आपल्या ऐतिहासिक वारसा विषयी आस्था निर्माण व्हावी म्हणुन मागील वर्षभरापासुन ‘हेरीटेज वॉक या किल्ला पर्यटनास चालना देणा- उपक्रमास सुरूवात करण्यात आलेली आहे.

चंद्रपुरातील किल्ला स्वच्छता मोहीम म्हणजे स्थानीक युवक-नागरीक आपला वारसा संवर्धनासाठी उचलले पाऊल असुन सदर कार्य राज्यातील विवीध भाग व्हावे याकरिता ‘आपला वारसा, आपणच जपु या या उपक्रमाचे आयोजन करून राज्यभरातील ३० जिल्हयात जात मोटारसायकलने ४५०० किमी चा प्रवास पुर्ण करून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आज हेरीटेज वॉक या उपक्रमात जिल्हा क्रिडा अधिकारी अनंत बोबडे, बॅक आॅफ महाराष्ट्रचे झोनल शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्री गजभीये, अमर गिये, माहेश्वरी समाज महीला मंडळच्या अध्यक्षा सुचीता राठी प्रामुख्याने सहभागी होते. तसेच माहेश्वरी महीला मंडळच्या जवळपास पन्नास महीला, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय तर्फे जिल्हयातील युवकांकरीता प्रशिक्षण शिबीर सुरू असुन या शिबीराचे शिबारार्थी सुध्दा सहभागी झाले होते. आज बगड खिडकी येथुन सकाळी साडे पाच वाजता हेरीटेज वॉकची सुरूवात करण्यात आली.

यावेळी बुरूज क्रंमाक ४ ते ९ वरून म्हणजेच बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यत प्रवास करण्यात आला, रामाळा तलाव लगतच्या सर्वात उत्तम असे बुरूजाविषयी माहीती, परकोटावरील पादचारी मार्ग, पिएचनगर मागील लोंखडी ब्रिज, बगड खिडकी, मसन खिडकी, गोंडराजे समाधीस्थळ, रामाळा तलाव, अंचलेश्वर मंदीर, गोंड राजचिन्ह याबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी पर्यटकांना माहीती दिली.

तसेच हेरीटेज वॉक दरम्यान गोंडकालीन इतीहास, विवीध स्मारकांचा इतीहास, त्याची पुर्वीची आजची स्थिती, स्वच्छतेपुर्वी व नंतर परकोटाचा भाग, संरक्षण भिंतीचे बांधकाम भविष्यातील उपयोगीता आदी बाबी इतीहास, वर्तमान माहीती तसेच किल्ला स्वच्छता अभियान मुळे सुरू असलेली अनेक कामे व भविष्यातील संकल्पना याबाबत विस्तृत माहीती जाणुन घेत हेरीटेज वॉकचा आंनद सहभागी नागरीक, महीला  व युवकांनी घेतला.

यापुढे सुध्दा आपल्या शहरातील समृध्द वारसा, गोंडकालीन इतीहास, सुंदर स्मारके इतरांना दाखविण्याकरीता, हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्याकरीता नागरींकाना घेउन येण्याचा संकल्प यावेळी नागरीकांनी केला. यावेळी शंभर पेक्षा अधिक नागरीक सहभागी झाले होते. यात माहेश्वरी महीला मंडळच्या गौरी काबरा, सोनल मुंदडा, अलका चांडक, कोमल सारडा, अर्चना बजाज, सुनीता सोमानी, अर्चना मुंधडा, लिना राठी, शिल्पा जाजु आदी सहभागी महीला सहभागी झाल्या होत्या तसेच चंद्रपूरकर पर्यटकांना माहीती देण्यासाठी इको-प्रो चे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News