...या कारणामुळे महिला क्रिकेटचे नियम बदलू नये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

 

  • महिला गोलंदाज शिखा पांडे यांची आयसीसीला विनंती

नवी दिल्ली : भारतीय महिला संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिने महिला क्रिकेटकडे प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याच्या हेतूने नियमांत बदल करू नयेत, अशी विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) केली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, महिला क्रिकेटमध्ये लहान आकाराचे चेंडू आणि कमी लांबीची खेळपट्टी यांचा वापर अनावश्‍यक असल्याचे शिखाने नमूद केले आहे. झुलन गोस्वामीनंतर महिला क्रिकेटमध्ये शिखा नव्या चेंडूची उत्कृष्ट गोलंदाज गणली जाते.

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हिन आणि भारताची उदयोन्मुख स्टार जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासमवेत आयसीसीने नुकतेच वेबिनार घेतले होते, त्यावेळी महिला क्रिकेटमध्ये नियम बदलांविषयी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शिखाने ट्विटद्वारे आपले मत मांडले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शिखा गोव्याचे प्रतिनिधित्व करते आणि ती या संघाची कर्णधारही आहे.

महिला क्रिकेट वाढण्यास आणि ते अधिक आकर्षित करण्यासाठी सुचविलेल्या बदलांविषयी मी बरेच वाचत आहे. वैयक्तिकदृष्ट्या बहुतेक सूचना अनवाश्‍यक असल्याचे मला वाटते, असे भारतीय हवाई दलात अधिकारी असलेल्या शिखाने लिहिले आहे. शिखाने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्यांत विकेट्‌स टिपल्या आहेत.

महिला क्रिकेटसाठी हलक्‍या वजनाचा चेंडू आणि यार्डची खेळपट्टी यांचा काय अर्थ असेल हे विषद करताना, शिखाने मीटर स्प्रिंटमधील समानता रेखांकित केली आहे. ऑलिंपिक 100 मीटर महिला धावपटू पहिल्या क्रमांकाचे पदक जिंकण्यासाठी धावत नाही आणि पुरुष धावपटूप्रमाणेच वेळ नोंदविते, असे तिने लिहिलेय. कारण काहीही असू द्या, पण खेळपट्टीची लांबी कमी करणे संशयास्पद वाटते, असे तिने नमूद केले आहे. महिला जास्त लांबवर फटका मारू शकत नाहीत, हे कारण देऊन चेंडूचे वजन कमी करण्याच्या ती पूर्णतः विरोधात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News