विमान प्रवाशांना 'हा' नियम लागू होणार नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 24 May 2020

दुसरीकडे रेल्वे बुकिंग करताना प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सुरू होणार नाही. सध्या रेल्वे प्रवास, खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.

मूंबई : विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांवर 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम लागू नसणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरिदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली आहे. मुळात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला विमानतळाच्या आवारात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे क्वारंटाईन करण्याचा प्रश्‍न गैरलागू आहे, असा युक्तिवादही हरिदीप सिंह पुरी यांनी केला. या निर्णयामुळे वेगळाच वाद उफाळण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी कामगार आणि विमान प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीवरून समाज माध्यमातून प्रचंड टीका झाली होती.

दुसरीकडे रेल्वे बुकिंग करताना प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सुरू होणार नाही. सध्या रेल्वे प्रवास, खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. प्रत्येकाला विमान प्रवासानंतर 14 दिवस क्वारंटाईन करणे व्यवहार्य नाही, असेही पुरी यांनी म्हटले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात अनेक विमान प्रवासी घरी गेल्यानंतर त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे आढळून आली होती. प्रवाशी आणि विमान कर्मचाऱ्यांना विमानतळापर्यंत सार्वजनिक किंवा खासगी वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार, विमानतळ व्यवस्थापनाची आहे, असेही नागरी उड्डाण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मुंबईत आजारी रुग्णांना टॅक्‍सी मिळत नाही, तिथे विमानतळ गाठण्यासाठी टॅक्‍सी उपलब्ध होईल, याबद्दल सांशकता आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती. सोमवारपासून (25 मे) देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाने तयारी केली आहे.

 

  • या सेवांवर निर्बंध
  • प्रवासादरम्यान जेवण, नाश्‍ता
  • विमानतळावर वर्तमानपत्र, मॅगझीन
  • ट्रॉली सेवा बंद

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News