सजग नागरिक निर्माण व्हावेत ही माहिती अधिकार कायद्याची अपेक्षाः अॅड. राजेंद्र पांडे

डाॅ विलास नांदुरकर
Sunday, 11 October 2020

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व माहिती अधिकार सप्ताह (६ ते १२ ऑक्टोबर) साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने ‘माहिती अधिकार कायदा 2005’ या विषयावर ते ऑनलाईन व्याख्यानप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ तुषार देशमुख उपस्थित होते.

सजग नागरिक निर्माण व्हावेत ही माहिती अधिकार कायद्याची अपेक्षाः अॅड. राजेंद्र पांडे

अमरावतीः देशात सजग नागरिक निर्माण व्हावेत, ही माहिती अधिकार कायद्याची अपेक्षा आहे. प्रशासनात उत्तरदायित्व निर्माण करुन भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, सुदृढ लोकशाही प्रस्थापित व्हावी, यासाठी माहितीचा अधिकार कायदा महत्वाचा आहे, असे प्रतिपादन माहिती अधिकार कायद्याचे तज्ज्ञ अॅड. राजेंद्र पांडे यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व माहिती अधिकार सप्ताह (६ ते १२ ऑक्टोबर) साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने ‘माहिती अधिकार कायदा 2005’ या विषयावर ते ऑनलाईन व्याख्यानप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ तुषार देशमुख उपस्थित होते.

पांडे यांनी माहितीचा अधिकार कायदा देशात कसा लागू झाला, याची पार्श्वभूमी व्याख्यानातून दिल्यानंतर सार्वजनिक प्राधिकारण म्हणजे काय?, माहितीचा अधिकार म्हणजे काय?, माहिती कशाप्रकारे व कोणाला मागता येते, माहितीचा अर्ज कसा करावा, माहिती न मिळाल्यास प्रथम अपील व द्वितीय अपील कसे सादर करावे, याबाबतची सविस्तर माहिती दिली.

एका अर्जामध्ये एकाच विषयाची माहिती मागितल्या जावी, माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती दिली पहिजे, मोठ्या प्रमाणावर माहिती मागितली असेल तर निरीक्षण देण्याची पद्धत, बीपीएल नागरिक असेल तर त्याचा पुरावा, वैयक्तिक माहिती, याशिवाय माहिती अधिकार कायद्याची विविध कलमे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला.

माहिती अधिकारी यांनी माहिती न दिल्यास दंडाबाबतची तरतूद, माहिती आयोगाचे अधिकार तसेच कायद्यासंदर्भात निर्गमित झालेले शासन निर्णय, परिपत्रक, माहिती आयुक्त आणि न्यायालयांनी दिलेले निर्णय, याबाबतची सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व माहिती अधिकार सप्ताह निमित्ताने आयोजित व्याख्यानप्रसंगी तज्ज्ञ वक्ते अॅड. राजेंद्र पांडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये माहितीचा अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना विहित मुदतीत माहिती दिल्या जाते.  अॅड पांडे यांचे व्याख्यान युट्यूबवर उपलब्ध आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News