मोदी सरकारच्या एका वर्षात ७१ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

मुबई: आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक बँकेत घोटाळे झाले. यात ६ हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली आहे. हा घोटाळा तब्बल ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर झाला, अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिली. या घोटाळ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 'उच्चांक' नोंदवला.

मुबई: आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक बँकेत घोटाळे झाले. यात ६ हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली आहे. हा घोटाळा तब्बल ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर झाला, अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिली. या घोटाळ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 'उच्चांक' नोंदवला.

एका पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत आरबीआयला या विषयी माहिती मागीतली होती. व्यावसायिक बँका व वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली, असे आरबीआयच्या उत्तरात म्हटले आहे.

युपीए सरकारच्या काळात मोठा भ्रटाचार झाला, आम्ही 'भ्रटाचार मुक्त भारत' करु या घोषनेवर मोदी सरकार निवडून आहे. मोदी सरकारच्या काळाच घोटाळे वाढले आहेत. हे आरबीआयच्या आकडेवारी वरुन स्पष्ट होते. सरकारने गाजा-वाजा करत नोटाबदली केली, प्रधानमंत्री जनधन योजनातून शुन्य बॉलन्य खाते उघडले यामुळे बॅकांचे कंबरडे मोडले. आता घोटाळ्यामुळे बॅक डबघाईस आल्या आहेत.
 
२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये ४१ हजार १६७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला. तसेच, त्यावेळी गैरव्यवहाराची ५ हजार ९१६ प्रकरणे घडली होती. गेल्या ११ आर्थिक वर्षांचा विचार केल्यास या कालावधीमध्ये बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या तब्बल ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद झाली आहे. या घोटाळ्यांची एकूण व्याप्ती २.०५ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News