रेडमी K20 Pro स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांची बंपर ऑफर; 'या' तारखेला होणार ऑफरचा शेवट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

ग्राहकांनी लवकरात लवकर या संधीचं सोनं करण्यासाठी आता फक्त चार दिवस ग्राहकांकडे उपलब्ध आहेत.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिवसेंदिवस मोबाईलवर नवीन ऑफर दिल्या जात आहेत, मात्र रेडमी के20 प्रो या फोनवर चक्क चार हजार रुपयांची बंपर ऑफर देण्यात आली. ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे, त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या संधीचं सोनं करण्यासाठी आता फक्त चार दिवस ग्राहकांकडे उपलब्ध आहेत.  

6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेला रेडमी के20 प्रोची मुळ किंमत 26 हजार 999 रुपय होती. त्या चार हजार रुपये सूट देण्यात आले आता हा स्मार्टफोन 22 हजार 999 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. त्यासाठी ॲमेझॉन फ्लिपकार्ट एमआय डाट कॉम या ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन मोबाईलची खरेदी करता येणार आहे, त्यामुळे ग्राहकांना घरी बसून ही ऑफर घेता येईल.

जाणून घ्या फिचर? 

रेडमी के 20 प्रो स्मार्ट फोनमध्ये 6.29 इंचाचा अमोलेड फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला. ऑक्टाकोयर क्वॉलकॉन स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेस देण्यात आला. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज एका मेमरी कार्ड द्वारे वाढवण्याची सोय आहे. 10  ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल चालणार आहे. मोबाईल मध्ये दोन नानो सिम कार्ड सपोर्ट करतील, 4000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली. फोटो काढण्यासाठी 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 13 मेगापिक्सल कॅमेरा साईट कॉमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा असे तीन रियर कॉमेरे देण्यात आले. त्याचबरोबर सेल्फी काढण्यासाठी 13 मेगापिक्सल कॉमेरा देण्यात आला आहे. कार्बन काळा, फ्लेम लाल,  पर्ल निळा आणि ग्लेशियर निळा अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News