रोनाल्डोची  सॅम्पदोरीयाविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटिसने अखेर इटलीतील व्यावसायिक फुटबॉल साखळीत विजेतेपद जिंकण्याची औपचारिकता पूर्ण केली.

मुंबई  रोम:  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटिसने अखेर इटलीतील व्यावसायिक फुटबॉल साखळीत विजेतेपद जिंकण्याची औपचारिकता पूर्ण केली. यामुळे युव्हेंटिसने सलग नवव्यांदा सिरी ए विजेतेपद जिंकले. त्यामुळे ते इटलीतील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत आता सलग तीन हजार दिवस विजेते झाले आहेत.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने सॅम्पदोरीयाविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्याने पूर्वार्धातील भरपाई वेळेत गोल केला; तसेच संघाच्या दुसऱ्या गोलात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर त्याने पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी दवडली; पण युव्हेंटिसने 2-0 विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावरील इंटर मिलानला सात गुणांनी मागे टाकले आणि जेतेपद निश्‍चित केले. युव्हेंटिसने 6 मे 2012 मध्ये विजेतेपद जिंकले. तेव्हापासूनच तेच विजेते आहेत.

रोनाल्डोची कामगिरी त्याच्या चाहत्यांसाठी सुखावणारी होती. कडक उन्हात लागोपाठ लढती असूनही त्याचा खेळ फारसा खालावला नाही. त्याचे आता मोसमात 31 गोल झाले आहेत. ब्रेकनंतर लढती सुरू झाल्यावर त्याचे 10 गोल झाले आहेत. युव्हेंटिसच्या सलग दुसऱ्या सिरी ए विजेतेपदात वाटा उचलला याचा खूप आनंद आहे. हे विजेतेपद युव्हेंटिसच्या चाहत्यांना अर्पण करीत आहे, असे त्याने सांगितले.

युव्हेंटिसचा दबदबा
- युव्हेंटिसचे हे एकंदर 36 वे विजेतेपद
- सलग नऊ विजेतेपद जिंकण्याची कामगिरी युरोपातील आघाडीच्या पाच देशातील एकमेव संघ
- युव्हेंटिसचे मार्गदर्शक मॉरिझिओ सारी हे सिरी ए विजेतेपद जिंकलेले सर्वात बुजुर्ग मार्गदर्शक
- युव्हेंटिसने या मोसमात 38 गोल स्वीकारले आहेत. विजेत्या संघाने स्वीकारलेल्या गोलची ही बरोबरी
- युव्हेंटिसच्या सलग नऊ विजेतेपदात संघातील जिऑर्गिओ चिएल्लीनी हाच एकमेव खेळाडू
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News