रोनाल्डोला 'या' प्रतिस्पर्धीने टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

 लिओनेल मेस्सीने ला लिगामधील सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार जिंकला; पण मेस्सीचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीतील सिरी ए लीगमधील सर्वाधिक गोलच्या पुरस्काराच्या स्पर्धेत मागे पडला आहे

मुंबई  रोम:  लिओनेल मेस्सीने ला लिगामधील सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार जिंकला; पण मेस्सीचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीतील सिरी ए लीगमधील सर्वाधिक गोलच्या पुरस्काराच्या स्पर्धेत मागे पडला आहे. फुटबॉलजगतात फारशा प्रसिद्ध नसलेल्या सिरो इममोबाईल याने त्याला मागे टाकले आहे. लीगचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने रोनाल्डोवरील दडपण वाढले आहे.

रोनाल्डोचा युव्हेंटिस उदिनिसविरुद्ध इटालीयन लीग लढतीत पराजित झाला. अर्थात त्यानंतरही युव्हेंटिसच्या विजेतेपदास फारसा धक्का बसणार नाही. या पराभवानंतरही युव्हेंटिसने दुसऱ्या क्रमांकावरील ऍटलांटास सहा गुणांनी मागे टाकले आहे. तीनपैकी एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला, तरी त्यांचे जेतेपद निश्‍चित होऊ शकेल. मात्र रोनाल्डोला या सामन्यात एकही गोल करता आला नाही आणि हे त्याच्या चाहत्यांना जास्त सलत आहे.
रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी अचानक कॅगलियारीचे गोल महत्त्वाचे झाले आहेत. कॅगलियारी लॅझिओविरुद्ध 1-2 पराजित झाले; पण कॅगलियारीचा एकमेव गोल सिरो इममोबाईल याने केला. इममोबाईलचा सिरी ए मोसमातील 31 वा गोल आहे, तर रोनाल्डोचे 30 गोल आहेत.
इममोबाईलची कामगिरी सच्चा इटालीयन फुटबॉलप्रेमींनाही सुखावत आहे. या लीगमध्ये तीस गोल केलेला तो इटलीचा केवळ पाचवा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी ल्युका टोनी याने केली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News