रोमॅंटिक रिलेशनशिप      

संतोष भिंगार्डे
Saturday, 16 May 2020
  • वेबसिरीज : हम तुम और देम,

एका मुलीची आई आणि तीन मुलांचा बाप हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. स्वतःची सुख-दुःखे एकमेकांशी शेअर करतात. त्यानंतर त्यांचा प्रेमाचा त्यांच्या मुलांवर काय परिणाम होतो... यावर आधारित वेबसिरीज म्हणजे "हम तुम और देम'. रोमॅंटिक रिलेशनशिप आणि कौटुंबिक अशी ही वेबसिरीज आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीची ही पहिलीच वेबसिरीज असून यात तिची अतिशय बोल्ड दृश्‍ये आहेत. तिच्यासोबत आहे अक्षय ओबेरॉय.

अक्षय या वेबसिरीजमध्ये तीन मुलांचा बाप आहे; तरी तो फारसा गंभीर नाही. काहीसा बेफिकीर आणि बेपर्वा वृत्तीचा आहे. श्वेता एका मुलीची आई असली, तरी ती अत्यंत हुशार आणि करिअरिस्ट असते. टेक्‍स्टाईलच्या उद्योगांत ती काम करीत असते. तिची आणि अक्षयची भेट होते आणि दोघे एकमेकांकडे कमालीचे आकर्षित होतात. ही वेबसिरीज रोमॅंटिक असली, तरी ती तितकीच भावनाप्रधान आणि कौटुंबिक आहे. यामध्ये एक रोमॅंटिक गाणेदेखील आहे आणि ते खूप चर्चेत राहिलेले आहे.

श्वेताचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे. खरे तर श्वेता तिवारी हे छोट्या पडद्यावरचे मोठे नाव. कसौटी जिंदगी की या मालिकेद्वारे ती घरोघरी पोहोचली. "बिग बॉस'ची विजेती आहे. आणि आता तिने वेबविश्वात या मालिकेद्वारे पदार्पण करून यशस्वी झाली आहे. अक्षय ओबेरॉयने पित्याची भूमिका झकास साकारली आहे. दिग्दर्शन सहिर रझा यांचे आहे; तर निर्मिती दीया सिंह यांनी केली आहे. एकूण पंधरा भागांची ही मालिका झी 5 आणि अल्ट बालाजीवर रसिकांना पाहता येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News