‘मलंग’मध्ये रोमान्सह, ॲक्‍शनचा मालमसाला असणारा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020

दिशा-आदित्यचे रोमॅण्टीक सीन्स विशेष लक्षवेधी ठरत आहेत. अनिल कपूर, कुणाल खेमू यांचीही एक झलक या ट्रेलरमध्ये आहे. त्यातील दिशाचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे. रोमान्स, ॲक्‍शनचा मालमसाला असणारा हा चित्रपट दिशा-आदित्यच्या हटके केमिस्ट्रीमुळे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतोय.

दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यासाठी निमित्त ठरला आहे तो ‘मलंग’ चित्रपट. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सरस असणार असे अनेकांनी तर्क-वितर्क लढवले.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्यामधील दिशा-आदित्यचे रोमॅण्टीक सीन्स विशेष लक्षवेधी ठरत आहेत. अनिल कपूर, कुणाल खेमू यांचीही एक झलक या ट्रेलरमध्ये आहे. त्यातील दिशाचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे.

रोमान्स, ॲक्‍शनचा मालमसाला असणारा हा चित्रपट दिशा-आदित्यच्या हटके केमिस्ट्रीमुळे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतोय. ट्रेलरमध्ये जरी झगमगाट दिसत असला तरी चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावणार का, हे पाहणंही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News