रोहितच्या 'सूर्यवंशी'ची डेट रिलीज; धम्माल व्हिडीओ केला शेअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020
  • हा जबरदस्त व्हिडीओ अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.  तर रणवीर सिंग याने आपल्या इंस्टाग्रामवरून तो शेअर केला आहे.  

मुंबई : 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स', 'सिम्बा' या कॉप सिरीजमधील  रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरीना कैफ, रणवीर सिंग, अजय देवगण अशी तगडी कास्ट आहे. रणवीरच्या सिम्बा या चित्रपटातूनच रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अनोख्या पद्धतीने समोर आणली आहे. हा व्हिडीओ अक्षय कुमारने आपल्या ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.  

या व्हिडिओमध्ये लहान मुलांचा वेगळ्या पद्धतीने केला आहे. ही लहान मुलं रणवीर सिंगला २४ मार्च लिहिलेला कागद देतात. त्याच्याकडून होकार येताच ही मुलं तो पेपर घेऊन सिंघम अजय देवगणकडे पोहचतात. त्याच्याकडून होकार घेत चिल्लर पार्टी पोहचते थेट सूर्यवंशी अक्षय कुमारकडे..! अखेर २४ मार्च ही रिलीज डेट या चिमुकल्यांकडून रिलीज करण्यात येते. तसेच येत्या २४ मार्चपासून सर्व चित्रपटगृहे २४ तास सुरु राहणार आहे, असं सांगण्यात येत आहे. 

 

हा जबरदस्त व्हिडीओ अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.  तर रणवीर सिंग याने आपल्या इंस्टाग्रामवरून तो शेअर केला आहे.  अल्पावधीतच या व्हिडीओला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.  या व्हिडिओमध्ये रिलीज डेट जाहीर झाली असून या चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'सूर्यवंशी' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. मात्र ही तारीख १२ जून २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता या दोन्ही तारखा बाजूला ठेवत मार्च महिन्यात या चित्रपट रिलीज होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News