रोहितचा शर्माचा उंच झोका कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020

रोहितचा शर्माचा उंच झोका कायम

रोहितचा शर्माचा उंच झोका कायम

भारताच्या मातीतं असंख्य खेळात अनेक खेळाडू घडले, प्रत्येक खेळाडूनं आपला खिलाडीपणाला वेगळेपणा खेळताना मैदानात जपल्याचे आजवर पाहिले. तसेच सध्या खेळत असलेल्या खेळाडूकडून सुध्दा त्यांची वेगळी खिलाडूवृत्ती जपताना आपण पाहतोय, त्यापैकी एक खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. क्रिकेटच्या कारकीर्द सुरू झाल्यापासून आपलं वेगळेपण त्याने जपलं ते म्हणजे हीटमॅन म्हणून, आणि आजही तो ते जपताना आपण पाहतोय.

भारतात आयपीएल सुरू झाल्यानंतर भारतातल्या कानाकोप-यातल्या खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असं म्हणायला हरकत नाही. कारण आयपीएल सुरू झाल्यानंतर अनेक खेळाडू भारताला मिळाले. तसेच प्रत्येक खेळाडू अर्थिकदृष्ट्या सक्षण झाला. अनेक खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळत नाही. परंतु आयपीएल सारख्या स्पर्धेमुळे त्यांची इच्छा पुर्ण झाली.

यंदाच्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर भारतातली आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली कारण त्यामुळे अधिक कोरोनाचा प्रादुर्भाव होईल सरकारला शंका होती. त्यामुळे ही स्पर्धा युएईत आयोजीत करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात एका संघातील खेळाडूंना कोरोना झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली आणि आयपीएल होणार की नाही याबाबत चाहत्यांकडून शंका उपस्थित केली जाऊ लागली.

१९ तारखेपासून या स्पर्धेला सुरूवात होत असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. होणा-या आयपीएलची तयारी मुंबई इंडियन्सचा संघ अबुधाबी येथे सराव करीत आहे. विशेष म्हणजे हिटमॅन म्हणून प्रसिध्द असलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघाचा कर्णधार देखील आहे. सरावादरम्यान रोहित शर्माने यंदाचं आयपीएल कशाप्रकारे खेळलं जाऊ शकत याची झलक सुध्दा दाखवली आहे.

आबुधाबीतील शेख झायेद मैदानात सराव करत असताना रोहितने मारलेला षटकार थेट मैदानाच्या बाहेर गेला आणि तो एका धावत्या बसला लागला. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला असून तो चाहत्यांना अधिक आवडला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News