रोहित पवारांनी 'या' युवा कुस्तीपटूला दिला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

रोहित पवारांनी 'या' युवा कुस्तीपटूला दिला मदतीचा हात

रोहित पवारांनी 'या' युवा कुस्तीपटूला दिला मदतीचा हात

अहमदनगर - रोहित पवारांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांचं प्रत्येक गोष्टीतलं वेगळेपण आपण पाहतोय, तेचं वेगळेपण जपत रोहित पवारांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका युवा कुस्तीपटूला आर्थिक मदत केली आहे. कापरेवाडील उदयोमुख कुस्तीपटू सोनाली कोडिंबा मंडलिक असं त्या खेळाडूचं नाव आहे. त्याशिवाय इतर स्पर्धामध्येही त्यांनी भरपूर पदके मिळवली आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने सोनालीने घर नसल्याने झोपडीतचं सराव सुरू केला आहे. विशेष म्हणजे सोनालीच्या वडिलांना कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे.

वडिलांची इच्छा सोनालीने पुर्ण करण्याचं ठरवलं आहे. सोनालीच्या वडिलांची इच्छा आहे की, सोनालीने क्रीडा प्रकारात भारताचं नेतृत्व करावं. मुलीला राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करत यावी, यासाठी ते स्व:च्या झोपडीत तिचा सराव करून घेत आहेत. त्यांच्याकडे स्वत:चं घरं सुध्दा नाही. तसेच सोनाली एका कर्जतच्या महाविद्यालयात तिचं १२ वीचं शिक्षण घेतं आहे. तिला आर्थिक पाठबळ मिळालं तर ती नक्की भारताचं प्रतिनिधित्व करेल असा सोनालीला विश्वास आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News