लॉकडाऊनमध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार यांचा पुढाकार; पाहा काय केले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 March 2020
विद्यार्थ्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन ‘सृजन फौंउंडेशन’ आणि ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’ या संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसांपासून मोफत जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थांना मोठा आधार मिळाला आहे.

मुंबई :- कोरोना व्हायरस संक्रमित झाल्यामुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याच पुण्यात स्पर्धा परीक्षेसाठी बाहेरून विद्यार्थी आले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या मेसने जेवणाचे डब्बे बंद केले आहेत त्यात बाहेर सर्वत्र बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीतून साडेसातशे ते आठशे विद्यार्थी जात आहेत. या विद्यार्थ्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन ‘सृजन फौंउंडेशन’ आणि ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’ या संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसांपासून मोफत जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थांना मोठा आधार मिळाला आहे.

पुण्यात कोरानाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक समस्यांना लोकांना समोरे जावे लागत आहे. पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हटले जाते. पुणे शहरात अनेक शहरातून किंवा खेड्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्या मुलांच्या समोर कोरोनामुळे सर्वात मोठी अडचणीला तोंड द्यावे लागते ते म्हणजे त्यांची खानावळी बंद झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व विद्यार्था समोर दोन वेळेच्या जेवणाची गैरसोय झाले आहे. ही गैरसोय समजून घेऊन रोहित पवार यांनी त्यावर एक उपाय योजना केली आहे, ‘सृजन फौंउंडेशन’ आणि ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’ या संस्थांच्या माध्यमातून या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना हाती घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

या विद्यार्थांना दररोज दोन वेळचे जेवण मोफत देण्याची संकल्पाना केली आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांना मोफत जेवण देण्याची व्यवस्था केली आहे. या उपक्रमासाठी पुण्यातील काही ठराविक २० ठिकाणे निवडलेली आहेत जेथे मुलांना हे जेवण दिले जाईल एवढेच नव्हे तर जेवणाची वेळ ही ठरलेली आहे. एका ठराविक वेळेतच मुलांना हे जेवण दिले जाणार आहे. दररोज साडेसातशे ते आठशे विद्यार्थाच्या जेवणाची सोय केली जाणार आहे. त्यांना जेवणात सर्व पौष्टिक आहारच दिला जाणार आहे. त्यामध्ये पुलाव, पुरी-भाजी, वरण-भात, उपमा इत्यांदीचा समावेश असणार आहे. सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचनाचे पालन केले आहे. या उपक्रमासाठी पस्तीस जणांची टीम काम करत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News