भाजप नेते आशिष शेलारांच्या ट्विटला रोहित पवारांचं जोरदार प्रतिउत्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • जुलै महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने ३० सप्टेंबर पर्यंत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना, राज्य सरकार तसेच देशातील विद्यापीठांना दिल्या होत्या.
  • परंतु कोरोना काळात विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य हित लक्षात घेऊन यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर आदित्य ठाकरे  यांच्या युवसेने सहित देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

मुंबई :- जुलै महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने ३० सप्टेंबर पर्यंत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना, राज्य सरकार तसेच देशातील विद्यापीठांना दिल्या होत्या. परंतु कोरोना काळात विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य हित लक्षात घेऊन यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर आदित्य ठाकरे  यांच्या युवसेने सहित देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत त्या घ्याव्याच लागतील, परंतु ज्या राज्य सरकारला यूजीसीने दिलेल्या सूचनांनुसार ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेणे शक्य नाही त्यांनी यूजीसीला पत्र लिहून परीक्षा काही काळ पुढे ढकलण्याची विनंती करायची आहे असे न्यायालयाने निर्णय देताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे असे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी म्हंटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णया विषयी ट्विट केले. त्यांनी आदित्य ठाकरे यांचा "बबड्या" असा उल्लेख करून त्यांच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना सरकारने  नाहक त्रास दिला, त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खोळंबा केला. आम्ही वारंवार सांगून सुद्धा अहंकारी सरकारने आमचे ऐकले नाही, परंतु मा. सर्वोच्च न्यायालायने अखेर न्याय दिला! ह्या शब्दात त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. 

आशिष शेलारांनी केलेल्या ट्विटला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलारांचा उल्लेख करून आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्या साऱखील राजकीय नव्हती तर ती विद्यार्थ्यांच्या काळजी पोटी होती आणि राहील असे सांगितले. तसेच बबड्याची सिरीयल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हाला ही हे पटल असतं. आता त्यासाठी आपण केलेल्या ट्विट खालील रिप्लाय तरी वाचा अश्या शब्दात आशिष शेलारांना रोहित पवार यांनी खडेबोल सुनावले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News