आमदार रोहित पवारांनी दिले जळगाव जिल्हा रुग्णालयास 500 लिटर सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 12 April 2020

आमदार रोहित पवार यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयाला 500 लिटर सॅनिटाईझर दिले. त्यामुळे आमदार पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

जळगाव : कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सतत सेनिटायझरने हात धुतले पाहिजे असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे सेनिटायझरची मागणी वाढली आणि बाजारात तुडवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयाला 500 लिटर सॅनिटाईझर दिले. त्यामुळे आमदार पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

कोरोना विषाणुचे जगभर सावट पसरले, भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन सुरु केले. कोरोनाला रोखण्यासाठी तोंडावर मास्क आणि सॉनिटाडझर वापरण्याचा सल्ला सरकारने नागरिकांना दिला. त्यामुळे सॉनिटायझर खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुबंड उडाली.

सध्या बाजारात आणि रुग्णालयात सॉनिटायझरची कमतरता आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी आमदार रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जळगाव  जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझर दिले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटाईझरचा खुप उपयोग होऊल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसने आमदार रोहित पवार यांचे आभार मानले..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News