रोहित पवारांनी दिला विरोधी पक्षांना सल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020

जग कोरोनाशी लढत असताना भाजपला राजकारण सुचत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे.

मुंबई: कोणत्याही राजकीय वादविवादात न पडणारे आमदार रोहित पवार यांनी आज भाजपविरोधात टीका केली आहे. जग कोरोनाशी लढत असताना भाजपला राजकारण सुचत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे.

कोरोनाच्या संकट काळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत; मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका, या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त केला. राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपच्या नेत्यांना राजकारणाचे पडले आहे. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात; तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून न्यायालयात जातात, पण न्यायालयानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा, असा सल्ला रोहित पवार यांनी ट्विटरवरून दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News