घरचा रस्ता संपतच नाय

शंभूराज पाटील
Tuesday, 24 September 2019

काहीच कळेना आज का
घरचा रस्ता संपतच नाय
दिवसभरच्या कामातून 
कंटाळा मात्र हसत हाय... 

काहीच कळेना आज का
घरचा रस्ता संपतच नाय
दिवसभरच्या कामातून 
कंटाळा मात्र हसत हाय ||धृ||

नेहमीपेक्षा आज थोड 
लवकरच सगळं आवरलं
थकलेल्या मनाला
घरच्या ओढीने सावरलं
माणसाच्या गर्दीत
मार्ग मात्र सापडत हाय
पण काहीच कळेना आज
घरचा रस्ता संपतच नाय ||१||

भरधाव मोठी वाहने रोज
अपघात घडवत होती..
तरीही माझी गाडी आज
वाढवत होती गती..
अजूनही होते निशाण रक्ताचे
तो रस्त्यावरच्या घात हाय
पण काहीच कळेना आज
घरचा रस्ता संपतच नाय ||२||

काळ्याभोर ढगांना मागून
अंधारातन गाठलं होत.
पावसाच्या येण्यान आता
डोळ्यातलं पाणी लपल होत.
काळजामध्ये वीज घुसली
घामाने अंग भिजले हाय.
पण काहीच कळेना आज
घरचा रस्ता संपतच नाय ||३||

शेवटी मोठं वळण घेवून
गाव कमान दिसू लागली
सुरवातीलाच स्मशानात
चीता कोणाची जळू लागली.
जवळ जावून पाहिलं तर
माझंच प्रेत जळत हाय.
पण काहीच कळेना आज का
घरचा रस्ता संपतच नाय ||४||
          

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News