मुंबईतील नद्यांचा पर्यटनासाठी वापर होणार !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020
  • नद्यांना पुनर्जीवित करण्याच्या संधर्भात सरकार प्रयत्नशील आहे .
  • नद्यांकडे  नाले म्हणून न पाहता नद्या म्हणून पहा .

पर्यावरणाच्या दुर्ष्टीने नद्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे. या प्रदूषित नद्यांना पुनर्जीवित करावे असा मुद्दा भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला . मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर, ओशिवार, ह्या नद्या वाढत्या कारखानदारी तसेच सांडपाणी यांमुळे प्रदूषित झाल्या  आहेत . अश्या  नद्यांची अवस्था पाहता ह्या नद्या आहेत कि नाला असा प्रश्न पडतोच . तसेच महाराष्ट्रतील इतर नद्यांच्या अस्वच्छतेचा प्रश्न देखील बिकट बनला आहे.

या प्रश्नावर उत्तर देत असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नद्यांना पुनर्जीवित करण्याच्या संधर्भात सरकार प्रयत्नशील आहे तसेच राज्यातील २१ नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव निधी निती आयोगकडे पाठवण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले . यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नद्यांना एक मोकळा स्वास देऊन त्यांचा वापर भविष्यात पर्यटनासाठी देखील केला जाईल असे सांगितले व नद्यांना नाले म्हणून न पाहता नद्या म्हणून कसे पाहता येईल असे देखील सुचवले . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News