नदी आणि सागर

संदिप पवार
Wednesday, 19 June 2019

एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी...

एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी...

वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली...

असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले...

शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले...

पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली...

सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.

तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली
अधुराच नदीविनाही सागर...!
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News