ऋतुजा झळकणार एक नव्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 December 2019

आता ती ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात भाई कोतवाल यांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवाल यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट इतिहासातील पार्श्‍वभूमीवर आधारित आहे.

अभिनेत्री ऋतुजा बागवेने नाटक आणि मालिकांतून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

आता ती ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात भाई कोतवाल यांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवाल यांची भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट इतिहासातील पार्श्‍वभूमीवर आधारित आहे. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.

त्याचबरोबर स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्‍शनच्या प्रवीण पाटील, एकनाथ देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ऋतुजासोबत अनेक कलाकारही झळकणार आहेत. त्यामुळे ऋतुजाला एका वेगळ्या ढंगात पाहणं रंजक ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News