रितेश-जेनेलिया घेणार ह्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020

नांदेड जिल्ह्यात यंदा " आनंदाचे डोही " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्त अशोक चव्हाण यांची सपत्नीक मुलाखत घेण्यात येणार आहे 

मुंबई : अभिनेते रितेश  देशमुख आणि जेनेलिया डिसुझा या जोडीची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरु आहे. ह्या चर्चेमागचे कारण सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.ह्या दोघांची जोडी प्रेक्षकांना आता मुलाखतकार म्हणून भेटीला येणार आहे. 

येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच वॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे खुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची मुलखात रितेश आणि जेनेलिया ह्यांच्याकडून घेण्यात येईल अशी बातमी आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा " आनंदाचे डोही " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्त अशोक चव्हाण यांची सपत्नीक मुलाखत घेण्यात येणार आहे त्यामुळे या मुलाखतीची मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. 

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या मुलाखतीचा कार्यक्रम नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदनावर संध्याकाळी ७ वाजता होणार असून ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण विविध मान्यवरांना देण्यात आले आहे     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News