भावाच्या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी रितेश उपस्थित; आठवणींना दिला उजाळा 

सकाळ वृत्तसेवा-यिनबझ
Monday, 30 December 2019
  • अमित आणि धीरज अशा दोन्ही भावंडांच्या प्रचारासाठीसुद्धा रितेश आणि त्याची पत्नी जेनिलियाने अनेक सभांमध्ये सहभाग घेतला होता.

मुंबई : अखेर आज राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा विस्तार होता आहे. एकूण ३६ मंत्र्यांची नावे मंत्रिपदाची शपथ घेणार हे यापूर्वीच समोर आले होते. यात २५ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे.

यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे थोरले पुत्र लातूरचे आमदार अमित देशमुख यांचा देखील समावेश आहे. अमित यांचा देखील आज शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला रितेश देशमुख याने उपस्थिती लावली आहे. 

अमित आणि धीरज अशा दोन्ही भावंडांच्या प्रचारासाठीसुद्धा रितेश आणि त्याची पत्नी जेनिलियाने अनेक सभांमध्ये सहभाग घेतला होता. रितेशने प्रत्येकवेळी उत्स्फूर्तपणे भाषण करत नागरिकांना देशमुख चिरंजीवांना मत देण्याची विनंती केली होती.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News