इगतपुरीच्या रितेश भंडारे यांनी पटकावला" शौकत श्री "

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

अतिशय चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेला प्रेक्षकांचा रात्री उशिरापर्यंत प्रतिसाद मिळाला.

मनमाड : नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने शौकत व्यायाम मंडळ व नॅशनल स्पोर्टस यांच्यातर्फे झालेल्या ‘शौकत श्री २०२०’ या शरीरसौष्ठव स्पर्धेत इगतपुरीच्या रितेश भडांगेने मानाचा किताब पटकावला. बेस्ट पोझरचा बहुमान मनमाडच्या वसीम शेख याला, तर प्रगतीकारक स्पर्धक म्हणून इगतपुरीच्याच संतोष तोकडे याला गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील विविध तालुक्‍यांतील तब्बल ८७ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. मनमाड, मालेगाव, घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, वणी, दिंडोरी, सिन्नर, लासलगाव, येवला, चांदवड आदी भागातील खेळाडूंची संख्या लक्षणीय होती.

त्यामुळे अतिशय चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेला प्रेक्षकांचा रात्री उशिरापर्यंत प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील स्पर्धकांचा सहभाग जिल्ह्यातील शरीरसौष्ठव प्रकारासाठी आश्‍वासक असल्याचे मत आयोजकांनी या वेळी नोंदविले. पंकज खताळ, इरफान मोमीन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले.

गोपाळ गायकवाड, शाबीरभय्या शाह, अन्सार शाह, आशिष पोहाल, नवीद शाह, अर्जुन जावळे, नीलेश भमणे, संजय सोनासे आदी प्रमुख पाहुणे होते. सहा वजनगटांत ८७ शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदविला. गोपाळ गायकवाड,
श्रीराम जाधव, राहुल पंडित, संकेत घोडके, अमोल जाधव,
अमन शेख पंच होते. रवींद्र वर्षे सूत्रसंचालन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News