रितेश देशमुखने वडिलांना वाहिली अनोखी आदरांजली; पाहा व्हिडीओ 

जगदीश जोगदंड
Tuesday, 26 May 2020

रितेश पट्टीचा अभिनेता पण या व्हिडिओत त्याचा अभिनय नाही तर वडीलाविषयीच्या भावना, आदर, श्रद्धा व आंतरीक ओढ ओसंडून वाहत होती.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील लोभस नेतृत्व म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख. यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेने अभिवादन केले. विविध विशेषणे वापरून सोशल मिडियातून आदरांजली वाहिली. परंतु, बाप अन् लेकाच्या नात्याचा मुलायम व हळूवार धागा असलेला रितेश देशमुख यांचा नि: शब्द व्हिडिओ मात्र राज्यातील जनतेला रडवून गेला.

बाप- लेकाचे असलेले अतूट व रेशमी नाते रितेशच्या त्या हळूवार पोस्ट मधून साकारल्या गेले. वडीलाचे पांढरेशुभ्र कपडे व त्या वरील जॅकेट याना हळूवारपणे कुरवाळत बिलगणारा रितेश डोळ्यात पाणी आणून गेला. तसे पहाता रितेश पट्टीचा अभिनेता पण या व्हिडिओत त्याचा अभिनय नाही तर वडीलाविषयीच्या भावना, आदर, श्रद्धा व आंतरीक ओढ ओसंडून वाहत होती. एकूणच नैसर्गिक असलेला हा व्हिडिओ म्हणूनच काळजाचा ठाव घेणारा ठरला. हृदयातील भावभावनांना रितेश देशमुख यांनी वाट करून दिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News