बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 April 2020

ते सोशल मीडियावर बिनधास्त बोलत असायचे. त्यांचं टविटरवर अधिक भर होतो. काही दिवसांपुर्वी आपण कोरोनाशी लढायचं आहे असं टविट त्यांनी केलं होतं. २ एप्रिलच्यानंतर त्यांनी एकही ट्विट केलेले नाही. 

मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईतील रूग्णालयात नुकतेच निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. मागील वर्षभरापासून ते अमेरिकेत कर्करोगावर अमेरिकेत उपचार घेत होते. सप्टेंबर महिन्यात ते उपचार पुर्ण झाल्यानंतर भारतात परतले होते. त्यांना फेब्रुवारी महिन्यात दोनदा मुंबईतल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर संपुर्ण बॉलीवूडवरती शोककळा पसरली होती. त्यातचं ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना प्रचंड त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल केले होते असे त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी सांगितले. ऋषी कपूर यांनी अखेरचा श्र्वास ८. ४५ मिनिटांनी घेतल्याचा कुटुंबियांनी सांगितलं. 

ते सोशल मीडियावर बिनधास्त बोलत असायचे. त्यांचं टविटरवर अधिक भर होतो. काही दिवसांपुर्वी आपण कोरोनाशी लढायचं आहे असं टविट त्यांनी केलं होतं. २ एप्रिलच्यानंतर त्यांनी एकही ट्विट केलेले नाही. 

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर, द ग्रेट शो-मन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही. कुटुंबाचा हा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पेलला. निखळ करमणूक आणि चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने नवे प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. चित्रपटसृष्टीचा कलात्मक अंगिकार ते 'फिल्म इंडस्ट्री' पर्यंतच्या प्रवासात ते सक्रिय राहीले. ते सहज सूंदर अभिनेता होते, तितकेच ते परखड आणि प्रांजळ व्यक्ति होते. रंगभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्वाप्रमाणे सर्जनशील ठसा उमटविला आहे. चित्रपट सृष्टीतील नव्या पिढीसाठी ते आश्वासक मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने कलाकारांच्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा निखळला आहे. भारतीय कला क्षेत्राची हानी झाली आहे. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी  होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांच्या निधनाचं दु:ख सहन करण्याचं बळ कपूर कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News