मराठा तरुणांच्या हक्कासाठी संभाजी महाराजेचं पुण्यात उपोषण

सकाळ (यिनबझ)
Saturday, 11 January 2020
  • संभाजीराजेंचे पुण्यात उपोषण

  • म्हणतात, 'सारथी' बंद करण्याचे षडयंत्र

पुणे: सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले याचं पुण्यातील सारथी संस्थेच्या बाहेर संभाजीराजे आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषण करत आहेत. 'सारथी बचाव' अशी हाक देत मराठा तरूणांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिबां दर्शवला आहे. 

 

संभाजीराजे यांनी जवळपास 22 वेळा पत्रकं देउनंही मुख्य सचिव असलेल्या जे.पी. गुप्ता यांनी याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही, तसेच 'सारथी'ला मुद्दामुन बदनाम करत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सा यारथी या संस्थेसाठी मी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली. पाठपुरावा करूणही काही झालं नाही म्हणुनच मी आंदोलनाचं हत्यार उपसलं असल्याचं ते म्हणाले .


सारथी संदर्मुभात ख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली होती भेट

शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी संभाजीराजे उपोषण करतआहेत, तिकडे पोहोचले आहे. राजेंची समजुत काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.  तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सारथी संस्था बंद होणार नाही, संभाजीराजेंनी उपोषण करू नये यावर योग्य तो मार्ग नक्कीच काढू असंही ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News