रिचा-शिवराज पहिल्यांदा एकत्र

यिनबझ ऑनलाईन टीम
Friday, 22 February 2019

मराठी चित्रपटांची निर्मिती वाढली आहे. नवीन निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबरच नवोदित कलाकारांची मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री होत आहे. हे नवोदित कलाकार आपले नशीब अजमावीत आहेत.

आता शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. यापूर्वी रिचाने गणेश आचार्यच्या ‘भिकारी’ या चित्रपटात काम केले आहे.

शिवराजने ‘फुंतरू’ आणि ‘अगं बाई अरेच्या’मध्ये काम केले आहे. मात्र या दोघांना एकत्र आणले आहे गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णीने ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटासाठी. आता चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट लग्न आणि त्यामध्ये होणाऱ्या गमतीजमती यावर आधारित असणार हे सांगायला नको; परंतु एकूणच फुल टू धमाल असा हा चित्रपट आहे.

यामध्ये रिचा आणि शिवराजबरोबरच मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, प्रवीण तरडे, अश्‍विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. कथा-पटकथा, संगीत, संवाद तसेच दिग्दर्शन ही सगळी जबाबदारी सलीलने उचलली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची ही प्रस्तुती आहे. गेरूआ प्रॉडक्‍शन आणि पीईएसबीची ही निर्मिती आहे. तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी तयार आहात ना १२ एप्रिलला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News