स्वराज्याचे धाकले धनी

केतन शिंदे, सातारा
Tuesday, 14 May 2019

 मुघलांस मातीत मिळवाया तो जन्मला,
 वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांने इतिहास रचला होता.
ज्या आलमगिरापुढे उभा राहण प्राणांतिक संकट,
त्यास पाठ दाखवूनी  दरबार त्याने सोडला होता.

म्याना बाहेर तलवारी एक साथ खेचल्या,
हर हर महादेव चा एकच गजर झाला.
शिंग तुता-यांची नौबत साऱ्या सह्याद्रीय झडली,
छावा पुरंदरावर जन्मास आला.

रूप त्याचे पाहुनी अभिमान वाटत होता,
 नेत्रांत  त्याच्या आगळीच चमक.
पाळण्यातच दिसत होते पाय त्याचे,
मुघल सुलतानीस लोळवण्याची होती त्याच्यात धमक.

साक्षात बाप म्हणून सिंह लाभला होता,
पित्याने त्याच्या गोरगरिबांच स्वराज्य उभ केलं. न्यायासाठी हाती समशेर उचलून,
सारं आयुष्य त्या अमर ध्येयापायी जाळलं.

ममतेस माईच्या तो दुर्दैवाने मुकला,
परमेश्वराने छाव्यावर वज्राघात केला.
 पण जाताना आई त्यास देऊन गेली संस्कार, त्याच्याच जीवावर त्याने भावी आयुष्याचा पट मांडला.

सोबतीला प्रेमाचा सागर -आजी,
 तिच्या देखरेखीखाली दमदार पावले पडू लागली.
छावा  जसजसा मोठा होऊ लागला,
 वाऱ्याच्या वेगाने हातात समशेर फिरू  लागली.

 मुघलांस मातीत मिळवाया तो जन्मला,
 वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांने इतिहास रचला होता.
ज्या आलमगिरापुढे उभा राहण प्राणांतिक संकट,
त्यास पाठ दाखवूनी  दरबार त्याने सोडला होता.

 छाव्याचा न भूतो न भविष्यती असा सिंह झाला,
गर्जना त्याची गगन फाडणारी होती.
तीर्थरूपांचे  आशीर्वाद पाठी त्याच्या होते,
 त्याची सारी कामे इतिहास घडवणारी होती.

 अनुभवले बिकट क्षण अनेकदा,
 आप्तांचे द्वेष भरले फटके त्याने सहन केले .
पण हृदयाची स्वप्ने - स्वराज्याची,
 स्वतःचे सारे दुःख त्याने बाजूस सारले.

 दिल्लीपती थकून गेला, मातून गेला,
'संभा' नावाचा काटा त्यास चुभत होता.
 माझ्या स्वराज्याचा एक एक किल्ला,
 त्यास  सात सात वर्षे झुलवत होता.

भ्याड फितुराईने त्याने राज्यास माझ्या घेरले,
हिंमत कोणाला सिंहाशी  दोन हात करण्याची. आलमगीराची पण कबर शेवटी याच मातीत मिळाली,
सिंहाने माझ्या खोळंबून करून ठेवली होती त्याच्या आयुष्याची.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News