'या' श्रीमंत रायगडास दंडवत... स्विकारावा मुजरा सलामीचा

सायली कदम
Wednesday, 5 June 2019

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जुन रोजी साजरा केला जाईल. या समारंभात लाखोंच्या प्रमाणात लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जुन रोजी साजरा केला जाईल. या समारंभात लाखोंच्या प्रमाणात लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये या शिवराज्याभिषेक सोहळ्याची खास ओळख आहे. एक मराठा राजा शिवछत्रपती ज्यांनी श्री रायगडाला महाराष्टाची राजधानी म्हणुन घोषित केले आणि तेथून सुरू झाला श्रीमंत महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याचा प्रवास.

रायगड किल्याला भेट देण्याची अनेक कारणे आहेत ज्यांसाठी आपण एकदा येथे आलेच पाहिजे...

महाडच्या उत्तरेस २५ की.मी. वर हा किल्ला असून याची सामुद्रासपाटी पासूनची उंची २७०० मीटर आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगातील हा एक दुवा आहे. सागरी किनारा दळणवळणासाठी हे ठिकाण जवळ आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे आणि शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पश्चिम डोंगरात शिवाजी महाराज यांनी रायगड ही राजधानी निवडली.

आपण येथे गेलात तर संपुर्ण रायगड पाहण्यात पूर्ण दिवस जाईल. जसं बाळ आपल्या आईच्या उदरात राहते, तसच रायगड सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे, म्हणूनच रायगड बघताच क्षणी पर्यटकांचे मन भारावून जाते. किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा विश्वासू कुत्र्याची (वाघ्याची) समाधी आहे.

जरी काही जुन्या पडझडीमुळे रायगडाने आपला मोह गमावला. अद्याप त्याच अनोखं ऐतिहासिक महत्त्व, जे लोकांना अजूनही येथे आकर्षित करते. जर तुम्हीसुध्दा रायगडला भेट देण्याचा विचार करत असाल, तर मान्सून हा एक परिपूर्ण हंगाम ठरेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News