तांदळाचा ढोकळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020
  • साहित्य

ढोकळा तुम्ही नेहमी खातात पण आज जरा नवीन पध्दतीचा तांदळाचा ढोकळ्याची रेसिपी घेऊन आली आहे. 

साहित्य :-

• ३ वाट्या तांदूळ
• १ वाटी उडदाची डाळ 
• अर्धी वाटी हरभरा / चणाडाळ
• १ चमचा मेथी दाणे 
• मुठभर पोहे
• मीठ
• कोथिंबीर
• मोहरी
• तेल 
• कडीपत्ता
• आलं

कृती :-

तांदूळ, उडदाची डाळ, चणाडाळ, मेथी दाणे आणि पोहे हे सर्व साहित्य दुपारी ३ च्या दरम्यान एकत्र पाण्यात भिजवले. रात्री ९ च्या दरम्यान मिक्सरला चांगले बारीक केले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टिमरमध्ये पाणी घालून बारीक फ्लेमवर गरम करायला ठेवले. 

दुसरीकडे आदल्या दिवशी बारीक केलेलले पीठ चांगले फुगून आले. त्यात किसलेले आलं, चवीनुसार मीठ आणि साखर १ चमचा तेल आणि १.४ चमचा इनो घालून एकाच दिशेने हलक्या हाताने हलवून घेतले आणि १० मिनिट हाय फेम वर वाफून गॅंस बंद केला. 

थंड झाल्यावर कढीपत्ता, मिरची, जिरे, मोहरी हिंगाची फोडणी आणि कोथिंबीर आणि किसलेले खोबरे वा खवलेला नारळ घालून खाण्यासाठी ढोकळा तयार झाला.

india

भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News