रियाची चौकशी; कोल्हापूरच्या तरूणाला फोन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

सागर सुर्वे हा तरूण सरकारी नोकरीत आहे. कामाच्या ठिकाणी सुध्दा वारंवार फोन येत असल्याने तो वैतागला होता.

रियाची चौकशी; कोल्हापूरच्या तरूणाला फोन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांशी शंका उपस्थित केल्या. त्या अनुशंगाने मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली. आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सद्या रिया चक्रवर्तीची कसून पोलिस चौकशी केली जात आहे. सुरू असलेल्या चौकशीत रियाचे कॉल रेकॉर्डींग काढण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाचा फटका कोल्हापुरातील एका तरूणाला बसला आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर एका वृत्तवाहिनीवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून मोबाईल नंबर दाखवण्यात आला होता. रियाचा नंबर कोल्हापूरातील सागर सुर्वे या तरूणाच्या नंबरशी साम्य आहे. दोघांच्या मोबाईल नंबरमधील एक अंक फक्त वेगळा आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सागरला अनेक कॉल येत आहेत. व्हॉट्सअप्प मेसेज येत आहेत. त्याचबरोबर अश्लील मॅसेज सुध्दा येण्यास सुरूवात झाली आहे.

सुरूवातीला संभ्रमावस्थेत असलेल्या सागरला काहीच समजले नाही. त्यानंतर एका वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या रियाच्या नंबरशी त्याचा मोबाईल नंबर साम्य असल्याचे त्याला समजले. इतके मॅसेज आणि कॉल येत असल्यामुळे सागरने मोबाईल नंबर बंद करून टाकला.

सागर सुर्वे हा तरूण सरकारी नोकरीत आहे. कामाच्या ठिकाणी सुध्दा वारंवार फोन येत असल्याने तो वैतागला होता. अनेकदा मोबाईल बंद करूनही हा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे सागरने मोबाईल नंबर बंद करण्याचा निर्णय घेतला. मोबाईल नंबर बंद केल्यामुळे सागरला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News