राज्य सरकारकडून एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020

राज्य सरकारकडून एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक

राज्य सरकारकडून एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकदा परीक्षा रद्द झाल्या, त्याचबरोबर परीक्षांची वेळापत्रकं सुध्दा बदलतं होती. परीक्षा होणार की नाही ? झाली तर केव्हा होईल या संभ्रमात पालक आणि विद्यार्थी होते. पण सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानंतर एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.

पीसीबी आणि पीसीएम अशा दोन ग्रुपसाठी ऑक्टोबर महिन्यातील वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती पीडीएफ स्वरूपात मोबाईल किंवा इतर डिव्हाईसमध्ये मिळवू शकता. सध्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेलं सुधारीत वेळापत्रक असून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

पीसीबी ग्रुपसाठी ऑक्टोबर महिन्यातील १, २, ४, ५, ६, ७, ८ आणि ९ या तारखा देण्यात आल्या आहेत. तर पीसीएम ग्रुपसाठी १२, १३, १४, १५, १६, १९, २० या ऑक्टोबर महिन्यातल्या तारखा देण्यात आल्या आहेत.

अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात योग्य माहिती देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्याचं प्रवेशपत्र सुध्दा त्यावरून डाऊनलोड करता येणार आहे. www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळून लावल्याने राज्य सरकारकडून या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News