बारावीचे अॅडमिशन घ्यायचे की फेरमूल्यांकन करायचे... प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

औरंगाबाद - राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याचा दावा करीत गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी आवश्‍यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. औरंगाबाद विभागात मंगळवारपर्यंत (ता.चार) छायांकित प्रतीसाठी दोन हजार, तर पुनर्मूल्यांकनासाठी दोनशे अर्ज आले आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर ध्यानात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या संदर्भात तातडीची पावले उचलली आहेत. यासाठी सकाळी नऊपासून विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. तसेच गुणपडताळणी व छायांकित प्रती विद्यार्थ्यांना लवकर मिळाव्यात यासाठी रात्री बारापर्यंत युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशी माहिती विभागाच्या सचिवांनी दिली. 

यावर्षी मंगळवारपर्यंत दोन हजार अर्ज छायांकित प्रतीसाठी दाखल झाले आहेत. प्रत्येक अर्जात विद्यार्थ्यांनी तीन ते चार विषयांच्या छायांकित प्रती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. या प्रती मिळवून देण्यासाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची मात्र धांदल उडताना दिसत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे छायांकित प्रत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत, ही बाब विचारात घेऊन या कामासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त जास्तीचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका पडताळणीच्या कामासाठी वाढीव शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

गुणपडताळणीसाठी आवश्‍यक छायांकित प्रत 
सध्या विद्यार्थी छायांकित प्रतीसाठी बोर्डाकडे अर्ज करीत आहेत. ही प्रत विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर गुणपडताळणीसाठी विद्यार्थी महाविद्यालय व विषयांच्या शिक्षकांकडून तपासून घेतात. यात गुणमूल्यांकनात तफावत आढळल्यास बोर्डाकडे तीनशे रुपये भरून गुणपडताळणीसाठी पुन्हा अर्ज केला जातो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News