सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी वाहूळ, सचिवपदी मंत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 December 2019

औरंगाबाद: सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या असोसिएशन ऑफ कॉलेज ऍण्ड युनिर्व्हसिटी सुपर ऍन्युएटेड टीचर्स, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांची फेरनिवड तर, सचिवपदी प्राचार्य जे. एम. मंत्री यांची बिनविरोध निवड झाली आहे.

औरंगाबाद: सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या असोसिएशन ऑफ कॉलेज ऍण्ड युनिर्व्हसिटी सुपर ऍन्युएटेड टीचर्स, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांची फेरनिवड तर, सचिवपदी प्राचार्य जे. एम. मंत्री यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संघटनेची नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी सर्वसाधारण सभेची बैठक नाशिक येथे नुकतीच पार पडली. सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेली ही राज्यातील एकमेव संघटना आहे. मागील दहा वर्षात या संघटनेने राज्य शासनाच्या विरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात एकुण 31 याचिका दाखल केल्या असून, त्यापैकी 25 याचिकांचे निकाल लागले. या निकालांमुळे सेवानिवृत्त प्राध्यापकांना 50 हजार ते 31 लाख रुपयांपर्यत लाभ मिळाले आहेत.

संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्राचार्य पी. वाय मद्वाण्णा (सांगली), सहसचिव डॉ. एम. एन. जाचक (नाशिक), कोषाध्यक्ष प्रा. एस. बी. नाफडे (औरंगाबाद) हे निवडून आले आहेत. तर डॉ. ए. डब्ल्यू. राऊत (अमरावती), डॉ. मानसिंग जगताप ( कोल्हापूर), प्रा. बी. बी. देशपांडे (नांदेड), प्रा. ए. बी. पाटील (जळगाव), डॉ. आर. बी. बीडकर (बार्शी) आणि औरंगाबादेतील प्रा. कुमूद गोरे-खेर्डेकर, प्रा. जी. टी. देगावकर, प्रा. लियाकत पटेल यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News