देशातील सर्वात आव्हानात्मक असणाऱ्या 'यूपीएससी' स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020
  • आज युपीएसी सिव्हिल सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.  
  • संघ लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत देशभरातील ८२९ परीक्षार्थींना यश मिळालं असून या परीक्षेत प्रदीप सिंग भारतातून पहिला आला आहे.

नवी दिल्ली :-  आज युपीएसी सिव्हिल सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.  संघ लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत देशभरातील ८२९ परीक्षार्थींना यश मिळालं असून या परीक्षेत प्रदीप सिंग भारतातून पहिला आला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत २३०४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते. यूपीएससी परीक्षांचा तिसरा टप्पा म्हणजेच मुलाखती. १७ फेब्रुवारी २०२० पासून परीक्षार्थींच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. परंतु मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या प्राधुरभाव वाढत असताना करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुलाखती घेण्यास दिरंगाई झाली. यानंतर २० ते ३० जुलै दरम्यान उर्वरित सर्व परीक्षार्थींची मुलाखत पारपडली होती. मुलाखत देण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्या उमेदवारांची यूपीएससीकडून योग्य सुविधा करण्यात आली होती. परीक्षेचा अंतिम निकाल परीक्षार्थींना यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर संघ लोकसेवा आयोगाने आज गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे जनरल कॅटेगरीतील ३०४, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग ७८, ओबीसी २५१, अनुसूचित जाती १२९ तर अनुसूचित जमातीच्या ६७ विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे.  

यूपीएससीच्या परीक्षांमार्फत आयएएस, आयपीएस, आयएफएस इत्यादी देशातील प्रतिष्ठित सेवांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देशातील सर्वात आव्हानात्मक असणाऱ्या यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केल आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वीतांपैकी महाराष्ट्रातील २० विद्यार्थ्यांचे नाव हे टॉपर्स लिस्ट मध्ये आहे. या यशस्वीत्यांपैकी महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे,
१. नेहा भोसले (रँक 15 )
२. मंदार पत्की (रँक 22  )
३. आशुतोष कुलकर्णी (रँक 44)
४. योगेश पाटील (रँक 63 )
५. विशाल नरवडे (रँक 91 )
६. राहुल चव्हाण (रँक 109)
७. नेहा देसाई (रँक 137 )
८. कुलदीप जंगम (रँक 135 )(रँक )
९. जयंत मंकाळे (रँक 143 )
१०. अभयसिंह देशमुख (रँक 151 )
११. सागर मिसाळ (रँक 204 )
१२. माधव गित्ते (रँक 210)
१३. कुणाल चव्हाण (रँक 211)
१४. सचिन हिरेमठ (रँक 213)
१५. सुमित महाजन (रँक 214)
१६. अविनाश शिंदे (रँक 226)
१७. शंकर गिरी (रँक 230)
१८. श्रीकांत खांडेकर (रँक 231)
१९. योगेश कापसे (रँक 249)
२०. सुब्रमण्य केळकर (रँक 249)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News