...या कारणामुळे यूएस ओपन बक्षिसाची रक्कम ६.३६ कोटी रुपयांनी कमी झाली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020
  • कोरोना विषाणूंमुळे खेळाच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला आहे.
  • यावेळी ३१ ऑगस्टपासून यूएस ओपन २०२० च्या बक्षीस रकमेमध्ये जोरदार कपात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :-  कोरोना विषाणूंमुळे खेळाच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला आहे. यावेळी ३१ ऑगस्टपासून यूएस ओपन २०२० च्या बक्षीस रकमेमध्ये जोरदार कपात करण्यात आली आहे. माहिती देताना यूएस टेनिस असोसिएशनने सांगितले की, मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी बक्षिसाची रक्कम $ ८.५० लाख म्हणजेच ६.३६ कोटी रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

यूएस टेनिस असोसिएशनने (यूएस ओपन २०२०) अहवाल दिला की, पुरुष आणि महिला एकेरीत चॅम्पियन्सला २०२० मध्ये तीन मिलियन डॉलर (सुमारे २२ कोटी ५४ दशलक्ष रुपये) बक्षीस म्हणून देण्यात येईल. यावर्षी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना एकूण ५३.४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३९९ कोटी) दिले जातील, जे मागील वर्षीच्या ५७.२ मिलियन डॉलर (सुमारे ४२७ कोटी रुपये) च्या तुलनेत सुमारे सात टक्क्यांनी कमी आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, यूएस ओपन स्पर्धेच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत सहभागी झालेल्या खेळाडूंना मिळालेली बक्षीस रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी खेळाडूंना ५८,००० डॉलर्स (सुमारे ४३ लाख रुपये) मिळाले होते, तर यावर्षी त्यांना ६१,००० (सुमारे ४५ लाख रुपये) मिळणार आहेत. यूएस ओपनच्या दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत पोहोचणार्‍या खेळाडूंना बक्षिसाच्या रकमेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News